तुळजापूर:- तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 25 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
25 मे रोजी होणाऱ्या या मेळाव्याच्या नियोजनासाठी बुधवार दि. 21 मे रोजी दुपारी 4 वाजता संयोजन समितीच्या सदस्यांची श्रीनाथ मंगल कार्यालयात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत मराठा समाज वधु-वर मेळाव्याच्या तयारी संदर्भात अनुभवी मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी मराठा समाज वधु-वर मेळाव्यातील सर्व संयोजन समितीच्या सदस्यांनी दुपारी 4 वाजता तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
0 Comments