Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व दैनिक सामनाच्या संपादिका रेश्मी ठाकरे यांच्याकडून स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या सोलापूरातील परिस गायकवाड याचा मातोश्रीवर सन्मान!!

सोलापूर:-नुकत्याच स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या महाराष्ट्र राज्य आयोगा कडून घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये परिस सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. या घवघवीत यशाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सामनाच्या संपादीका रेश्मी ठाकरे यांनी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी परिस गायकवाड यांचा सन्मान केला. व त्यांच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

परीस गायकवाड यांच्याकडून उपेक्षित मुलांना देखील मार्गदर्शन मिळावे सर्वसामान्य कुटुंबातील मुलानी देखील यांचा आदर्श घ्यावा. ग्रामीण भागातील मुले  जेव्हा असे यश मिळवतात तेव्हा ते कौतुकाला पात्र ठरतात.‌ असेही  उध्दवजी ठाकरे म्हणाले.  शिवाय परीस गायकवाड यांच्या मातोश्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड व पिताश्री ॲड.सुरेश गायकवाड यांचे देखील  ठाकरे परिवाराकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments