Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीची "जान्हवी जमदाडे" झळकली दहावीत.! 96% गुणांची कमाई करीत मिळवले घवघवीत यश!

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कु.जान्हवी महेश जमदाडे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सेमी इंग्लिशच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जान्हवीने तब्बल 96% गुण मिळवून शाळेत आणि काटी परिसरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. जान्हवीने मराठी  विषयात 100 पैकी 94 गुण मिळाले असून गणित या विषयात 100 पैकी 95 गुण मिळाले आहेत. तर हिंदी विषयात जान्हवीने 100 पैकी 85 गुण मिळविले असून इंग्रजी या विषयात तिला 94 गुण मिळाले आहेत. सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी विषयात 95 समाज शास्त्र विषयात 97 गुण मिळाले. एकूण 500 पैकी 475 गुण मिळवून दहावी परिक्षेत 96 टक्के गुण घेऊन प्राविण्य मिळवले आहे.

ती एल.जी. शिक्षण संकुल शेळगाव (आर) या शाळेची विद्यार्थीनी  आहे.जान्हवीचे वडील महेश  घनश्याम जमदाडे हे काटीतील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत, तर त्याची आई सौ.सुषमा गृहिणी आहेत. घरातून मिळालेल्या शैक्षणिक वातावरणाचा आणि संस्कारांचा जान्हवीच्या यशात मोलाचा वाटा आहे. 

या नेत्रदीपक यशाबद्दल जान्हवीने शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.माझे आई-वडील, चुलते किर्ती जमदाडे,चुलती अमृता आणि शिक्षक यांची प्रेरणा आणि त्यांच्या शिकवणीमुळेच हे यश संपादन करता आले, असे ती कृतज्ञतेने म्हणाली.
    
लहानपणापासूनच खेळ आणि अभ्यास दोन्हीमध्ये अव्वल असणाऱ्या जान्हवीचे भविष्यवेधी स्वप्न डॉक्टर बनण्याचे आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ती हे स्वप्न नक्कीच साकार करेल, यात शंका नाही. 
    
कु.जान्हवी महेश जमदाडे हिच्या या शानदार यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments