काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील उद्योजक विद्यासागर धोंडीबा ढगे यांच्या एकष्ठव्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. 23 रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथील जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा व येडेश्वरी कन्या प्रशाला या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व विविध 30 वृक्षांचे वाटप करण्यात आले.
आपला वाढदिवस चांगल्या प्रकारे कसा साजरा केला जाईल याकडे सध्या ग्रामीण भागातील तरुणात क्रेझ निर्माण झाली आहे.वाढदिवसाच्या दिवशी डीजे लावून नाचणाऱ्यांची संख्या आजकाल कमी नाही. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कार्य करणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील परंपरागत उद्योजक विद्यासागर ढगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या एकसष्ठी निमित्त जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा व येडेश्वरी कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गातील सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा मोठे या प्रमाणे 500 रजिस्टरचे विविध 30 वृक्षांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
वाढदिवसाचा अनाथायिक अनावश्यक खर्च टाळत तिन्ही शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व विविध 30 वृक्षांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी उपस्थितांनी ढगे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते उद्योजक विद्यासागर ढगे यांच्या एकसष्ठी निमित्त सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले...
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, आदेश कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, उद्योजक रामेश्वर लाडुळकर,शाळेचे मुख्याध्यापक कोळी, येडेश्वरी कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर बनसोडे, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक अमीन शेख,उपसरपंच चंद्रकांत काटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल गुंड, संपत पंखे, बाळासाहेब भाले,अनिल बनसोडे, संजय महापुरे,मकरंद देशमुख, वेंकटेश ढगे,विनायक ढगे,अतुल सराफ, दादा बेग,नाबाजी ढगे,त्रिगुणशील साळुंके,बाळु (काका)कुलकर्णी,श्रीकांत गाटे, प्रवीण विभुते,मेहबूब शेख,रज्जाक शेख,राजू आदलिंगे,बापू वाडकर,धनाजी लोहार, मनोज चव्हाण आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद,शिक्षेकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी,शिक्षण प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
पत्रकार उमाजी गायकवाड
मो.नं. 9923005236
0 Comments