काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे येथील बसस्थानक जवळील देशमुख कॉम्प्लेक्समध्ये गुरुवार दि.3 रोजी सकाळी 10:30 वाजता मॅक्स केअर मल्टी स्पेशल हॉस्पिटल वैराग संचलित "श्रीयश हॉस्पिटल" चा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला.
बार्शी तालुक्यातील वैराग येथील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ.विशाल आंधळकर व स्त्री रोग प्रसुती तज्ञ डॉ.प्रविण मासाळ यांच्या सर्व सोयींनी युक्त सुसज्ज "श्रीयश हॉस्पिटल" चा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धघाटन सोहळा संपन्न झाला.
काटीसह परिसरात पहिलेच हे बाल रोग व स्त्री रोग प्रसुती रुग्णालय होत असल्याने बालक व गरोदर माता आजारी पडल्यास त्यांना सोलापूर किंवा बार्शीला घेऊन जावे लागत असल्याने या हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे.रुग्णांची होणारी हेळसांड व गैरसोय लक्षात घेऊन डॉ.विशाल आंधळकर व डॉ.प्रविण मासाळ यांनी याठिकाणी सर्व सोयी सुविधासह बाल रोग व स्त्री प्रसुती रुग्णालय सुरू केले आहे.
या बाल रुग्णालयामध्ये सकाळी 8 ते 11 डॉ.विशाल आंधळकर व डॉ.प्रविण मासाळ सायंकाळी 5:30 ते 8 वाजेपर्यंत रुग्ण सेवा देणार असून या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या व महिलांच्या सर्व आजारावर खात्रीशीर उपचार,गरोदर महिलांसाठी योग्य मार्गदर्शन व उपचार, मुल न होणे,पाळी उशीरा येणे,पाळी न येणे,प्रसुती सोय,ॲडमिटची सोय,लहान बालकास वाफ घेण्याची सोय, बाळ वारंवार आजारी पडणे, सततचा सर्दी खोकला,वजन व उंची न वाढणे, झटके येणे,पोटाचे आजार,पल्स ऑक्सिमीटरची सोय,नवजात बालकांची कावीळ कमी करणे,लहान मुलांच्या श्वसनाचे आजार आदी सर्व आजारांवर उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना कमी खर्चात सेवा द्यावी
यावेळी बोलताना सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांनी श्रीयश हॉस्पिटलसाठी शुभेच्छा देऊन ग्रामीण भागातील रुग्णांच्या अडचणी समजून व त्यांच्या फायद्याचा विचार करून आपण नि:स्पृहपणे कमीत कमी फायदा ठेवून रुग्णांप्रति आपलुकी दाखवून सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उद्घघाटनप्रसंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,विक्रमसिंह देशमुख, सुजित हंगरगेकर, डॉ.विशाल आंधळकर, डॉ.प्रविण मासाळ,चंद्रकांत काटे,अनिल गुंड,अजित वाडकर,अमोल गावडे अनिल पाटील,उमेश शिनगारे,शरद अंबुरे,विकास साळुंके,बालाजी राऊत,नितीन साखरे, तबारक इनामदार, रोहित दूधभाते,तेजस नवले,जगन्नाथ जाधव,मृत्युंजय बगले आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments