काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी (मंगरुळ) येथील एकलव्य विद्या संकुल मध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या "कोरेवाडी" तील शालेय विद्यार्थ्यांची पावसामुळे वाटेतील हरणा नदीला पाणी आल्याने व पायवाटेने जाताना काटेरी झाडेझुडपे वाढल्याने कोरेवाडीतील यमगरवाडी विद्या संकुलात शिक्षण घेणाऱ्या 30 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला.कोरेवाडी ते यमगरवाडी अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या असणाऱ्या शाळेसाठी बस नसल्याने चांगलीच परवड होत आहे.
या कोरेवाडीतील विविध घटकांतील 43 विद्यार्थी यमगरवाडी येथील नामांकित एकलव्य विद्या संकुलामध्ये शिक्षणासाठी जातात. परंतु, शाळेला जाणारी वाट काटेरी झुडपाने,चिखलय झाल्याने त्यांना पाण्यातून वाट. शोधावी लागतेय. पावसाळ्यात पाऊस झाल्याने जवळपास दोन ते तीन महिने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरेवाडी ते यमगरवाडी वाटेवरील तीन किलोमीटर अंतरावरील दिड किलोमीटर अंतरावर डांबरीकरण झाले आहे. दिड किलोमीटर व वाटेतील नदीवरील पूलाचे काम रखडल्याने येथील विद्यार्थांना कोरेवाडीहून कुंभारी, मंगरुळ,कसई मार्गे यमगरवाडी शाळेत जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतर कापून बसने यावे लागते. या त्रासामुळे यमगरवाडी शाळेतील 30 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला आहे. यापूर्वी कोरेवाडीतील नागरिकांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले. परंतु रस्ता झाला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.
कोरेवाडील विद्यार्थ्यांना यमगरवाडी येथील शाळेत सुरक्षितपणे जाणे येणे साठी या मार्गावरील रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्त्याचे काम करण्याची मागणी पालक वर्गातुन होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
मुख्य संपादक उमाजी गायकवाड
Only न्युज धाराशिव
9923005236
0 Comments