मंगरुळ/चाँदसाहेब शेख
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झपाटल्याप्रमाणे काम करणारे मंगरुळ येथील युवा पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांचे कर्तव्य व अधिकार काय असते याची व्याख्या स्पष्टपणे ज्यांच्याकडे पाहून अधोरेखित होते असे माझे आदर्श सहकारी ज्येष्ठ मिञ लक्ष्मण माळी यांच्या वाढदिवसानिमित्त हा छोटासा शब्दप्रपंच
पोलीस पाटील हे गावगाड्यातील महत्वाचे स्थान निभावणारे पद तसे पाहिले असता हे महसुली दप्तरी पद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करून न्यायव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांच्याकडेच सोपवली व लहान सहान तंटे गावपातळीवरच मिटवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली.
तुळजापुर तालुक्यातील अतिशय संवेदनशिल व जागरूक गाव म्हणजे मंगरुळ याच गावाची पोलीस पाटीलकी युवा उद्योजक,उमद्या तरुणाकडे म्हणजे लक्ष्मण माळी यांच्याकडे परीक्षा पद्धतीने आली पोलीस पाटील हे पद पोलीस प्रशासन व ग्रामीण जनता यांच्यातील समन्वय साधण्याचा व लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारा महत्वाचा घटक लक्ष्मण माळी यांनी ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील अनेक संकल्पना प्रत्यक्षात लोकांपर्यत पोहचवण्यासाठी सदैव तत्पर व प्रयत्नशिल असतात त्यांनी ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थी संवाद, महिला सुरक्षितता जनजागृती,वडीलधाऱ्यांच्या अडीअडचणी ऐकुण व त्या सोडणुकीसाठी प्रयत्न करणे, अशा प्रकारच्या उपक्रमाना चालना दिली त्यांच्याकडे कोणताही सामान्य नागरिक कुठलीही धास्ती न बाळगता आपली व्यथा मांडतो त्यामुळे तेही निसंकोच गोरगरीब जनता आपल्याकडे व्यथा मांडतात हीच आपली खरी कमाई असल्याचे ते बोलतात
पोलीस पाटील म्हणजे शोभेचे पद नसून त्यात मानवतेची जान,संयम आणि संवेदशीलता आवश्यक असते हीच गोष्ट लक्ष्मण माळी यांच्या सहवासातून व वागणुकीतून प्रकर्षाने जाणवते कित्येक जणांना त्यांनी मानसिक संतुलनातून, प्रसंगी आर्थिक मदत करून सावरण्याच काम केल्याचं मि प्रत्यक्षदर्शी पाहिलं आहे.
अत्यंत सजग,शिस्तप्रिय आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले फक्त पोलीस पाटलाची भुमिका बजावत नसून तरूण युवकांसाठी, गोरगरीब समाजासाठी आदर्श मार्गदर्शक,रक्षक आणि मित्र म्हणूनही ओळखले जातात त्यांचा पोलीस पाटील या क्षेत्रांतील शिस्तीचा मार्ग,आचरणातील प्रामाणिकपणा व कार्यप्रणाली माझ्यासारख्या तरुणासाठी प्रेरणादायी आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार चांदसाहेब शेख यांच्या विशेष शुभेच्छा लेखातून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा मागोवा घेणे ही खरी अभिमानाची गोष्ट आहे.
कोरोनाकाळात गाव परिसरात अनेक प्रकारचे अभिनव व लोकोपयोगी उपक्रम राबवून जनमानसावर उमटवलेला ठसा आणि गोरगरिबांना हवेहवेसे वाटणारे त्यांचे निर्णय व शिस्तबध्द पध्दतीने शासनास केलेल्या शिफारशी यामुळे कर्तव्य कठोरतेचा ते आदर्श ठरले व यामुळे त्यांना कोरोनाकाळातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार चाँदसाहेब शेख व कुटूंबियाच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!
शब्दांकन:-
पत्रकार चाँदसाहेब शेख,
मंगरुळ ता.तुळजापुर
0 Comments