तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगरमध्ये सौ.शुभांगी गणेश पुजारी यांच्या पुढाकाराने पुजारी नगरमधील महिलांनी मिळून शुक्रवार दि.15 ऑगस्ट "देशभक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमी" या सुंदर संगमात सायंकाळी येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात
"श्रीकृष्ण जन्माष्टमी" चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केला.
या उत्सवात पुजारी नगरमधील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कृष्णाच्या विविध लीलांचे सादरीकरण केले.तसेच प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी महिलांनी मातीतून बनवलेला गोकुळाचा देखावा सादर करुन सोसायटी मधील वंश गणेश पुजारी या चिमुकल्याने वासुदेवाची भूमिका साकारत डोक्यावर आकर्षक सजविण्यात आलेली श्रीकृष्णाची मुर्ती ठेवून महिलांच्या गराड्यातून
"राधे कृष्ण गोपाल कृष्ण...भगवान गोपाल कृष्ण की जय, मुरलीधर की जय,जय श्रीकृष्ण.." च्या जयघोषात अतिशय धार्मिक वातावरणात या चिमुकल्या गोकुळाचे महिलांनी स्वागत केले. तसेच यावेळी पाळणा हालवत बाळकृष्णाच्या जन्माचंही मोठ्या उत्साहात स्वागत केले.
प्रारंभी या सोहळ्यामध्ये महिलांनी मिळून श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या आवारात कृष्णाची मूर्ती स्थापन केली आणि तिची विधिवत पूजा केली. कृष्णाच्या जन्माचा सोहळा मध्यरात्री दिड वाजेपर्यंत अतिशय धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महिलांनी कृष्णाच्या विविध गाण्यांवर नृत्य केले आणि सर्वांनी मिळून जन्माष्टमीचा आनंद लुटला. या कार्यक्रमात महिलांनी कृष्णाच्या बाललीलांचे नाट्यरूपांतर सादर केले. पुजारीनगर मधील रुषी देवकर या चिमुकल्यास सुंदर असे वस्त्र व आभूषणांनी सजवल्यानंतर अत्यंत सुंदर व मोहक रूपात कृष्णाच्या वेशभूषा तर राधाच्या भुमिकेत दुर्गा या लहान चिमुकलीस वेषभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभागी केले होते.
सोसायटीतील या जन्माष्टमी उत्सवामुळे महिलांना एकत्र येऊन "श्रीकृष्ण जन्माष्टमी" उत्सव साजरा करण्याची संधी मिळाल्याने येथील वातावरण धार्मिक बनले होते तसेच सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments