काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कै. सोनबा येवले मुकबधिर निवासी विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव नितीन सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर केले.त्यानंतर विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. शाळेचे उपचार तज्ञ महेश भोसले यांनी आपल्या देशभक्तीपर भाषणात स्वातंत्र्य दिनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सचिव नितीन सरवदे, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश काकडे,सहशिक्षक अनिल पाटील, महेश भोसले यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments