काटी/उमाजी गायकवाड
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील काटी येथील लाडुळकर बंधूच्या सागर मोटर्सच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सागर मोटर्सचे सर्वेसर्वा परमेश्वर लाडुळकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा आणि रक्तसाठ्यात वाढ व्हावी या उद्देशाने सकाळी ध्वजारोहणानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत या उपक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्त केले.या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास सागर मोटर्सकडून त्यांच्या मोटारसायकलची फ्रि सर्व्हिसिंग व 100 रुपयांचे पेट्रोल देण्यात आले.
शिबिरात काटीसह परिसरातील तरुणांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करत समाजसेवेचा संकल्प केला. रक्तदान हे जीवनदान असल्याचे सांगत सर्वांनी रक्तदान करून समाजकार्यात हातभार लावावा असे आवाहन परमेश्वर लाडुळकर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष दिवशी सागर मोटर्सकडून समाजहितार्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे “देशभक्ती आणि मानवता” यांचा सुंदर संगम घडून आला होता.
या कार्यक्रमात सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख,मोहन जाधव, रामेश्वर लाडुळकर,आबा गाढवे, उद्योजक परमेश्वर लाडुळकर,ज्ञानेश्वर लाडुळकर,
संपत राऊत,अतुल भोसले, वसीम तांबोळी,गोवर्धन सुरवसे,शंकर फुलसागर,प्रशांत गावडे,खंडू गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यासांठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
0 Comments