काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ऐश्वर्या ञिगुणशिल साळुंके हिने शालेय शिक्षण सोलापूर येथील सेवासदन हायस्कूलमध्ये पुर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे पुर्ण केले. तर वैद्यकीय शिक्षणासाठी तिला रशियाला पाठविण्यात आले. तिने प्रतिकूल परिस्थितीही, जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करुन रशियातील कुबान विद्यापीठातून एमबीबीएस चे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर भारतातील अतिशय कठीण समजली जाणारी फाँरेन मेडिकल ग्रँज्युएट एक्झामिनेशन (FMGE) परिक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. ऐश्वर्या साळुंके हिस तिचे चुलते सुभाष साळुंके व डॉ.शिवाजी साळुंके यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले.
काटी सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी ञिगुणशिल साळुंके यांना दोन मुलीच असून थोरली मुलगी ऐश्वर्या हि मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेणारी एका शेतकऱ्यांची मुलगी अनंत अडचणींचा सामना करून एमबीबीएस झाली. तिचे यश ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी प्रेरणादायी आहे. तर दुसरी मुलगी पुजा ञिगुणशिल साळुंके हि बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
ऐश्वर्याने वैद्यकीय क्षेञातील एमबीबीएस पदवी मिळविल्याबद्दल काटीसह परिसरातून तिचे कौतुक केले जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments