Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरळी बुद्रुक येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन

तुळजापूर:- तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तुळजापूर द्वारा आयोजित तालुकास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते उदघाट्न करून शुभारंभ झाला.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट,अणदूर, यमगरवाडी,होरटी, मेसाई जवळगा, निलेगाव, नंदगाव, हंगरगा तांडा,आरळी बुद्रुक,तुळजापूर आदी विस पेक्षा अधीक शाळां सहभागी झाल्या असून ग्रामीण भागात तालुका स्तरीय शालेय स्पर्धा
आयोजन होतं असल्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे.

याप्रसंगी तालुका क्रीडा मार्गदर्शन इसाक पटेल,
आरळी बुद्रुक गावचे सरपंच किरण व्हरकट, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष भास्कर पारवे, प्रशालेचे मुख्याध्यापक गौतम राठोड,माजी सरपंच गोविंद पारवे,श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल प्रमुख संजय पारवे, मकरंद बामनकर,राम तानवडे,शिवानंद गवळी,बाबासाहेब भोसले,संजय गवळी, ऍड. फारुख शेख, बाळासाहेब घेवारे, प्रकाश स्वामी, किरण गायकवाड,राजेश बिलकुले आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments