काटी/उमाजी गायकवाड
राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन उत्साहात पार पडले असताना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांनी आपल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वेगळेपण जपत व्यसनमुक्ती व ड्रग्ज विरोधात जनजागृतीपर समाजप्रबोधनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्यातील गणपती मूर्तीची विसर्जन मिरवणुक डिजेच्या गोंगाटाऐवजी बँन्जो व पारंपरिक ढोल-ताशा व हलगीच्या निनादात गुलालमुक्त वातावरणात पार पडली.
देश सेवा करणा-या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुध्दा एक कलाकार लपलेला असतो. या मिरवणुकीत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिकक्ष गोकुळ ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट ‘ या गाण्यावर तुफान डान्स केला.तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील रडू नको बाळा मी पाण्याला जाते..., खारे खोबरे तुला खायला देते!! या गवळणी गीतावर उत्साहाने ठेका धरला होता. नेहमी खाकी वर्दीतील पोलीसांनी मिरवणुकी दरम्यान पांढरे कपडे परिधान करीत गुलालमुक्त वातावरणात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात तामलवाडीतील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
सपोनि गोकुळ ठाकूर गणरायाचे पुजन करताना...या मिरवणुकीचा शुभारंभ तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिकक्ष गोकुळ ठाकूर यांच्या हस्ते गणरायाची आरती करुन झाली. यावेळी सपोनि शैलेश पवार,सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, तामलवाडीचे ग्रा.प.सदस्य यशवंत (अण्णा) लोंढे, यशवंत कुलकर्णी,रोहित पाटील, पञकार,पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने दरवर्षी गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या 27 गावांमध्ये सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकी अनंत चतुर्थी दिवशी संध्याकाळी काढण्यात येतात. त्यासाठी रात्रभर पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त रहावे लागते. म्हणुन त्यानंतर म्हणजे अनंत चतुर्थीनंतर दुसऱ्या दिवशी सोमवार दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस ठाण्यात तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिकक्ष गोकुळ ठाकूर यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करुन विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ करून गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणूकीत व्यसनमुक्ती व ड्रग्ज विरोधात समाजप्रबोधन व जनजागृतीपर संदेश
तामलवाडी पोलिसांनी पारंपरिक संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन या मिरवणुकी दरम्यान तामलवाडी पोलिसांनी आपले कर्तव्य जपत जनतेमध्ये व्यसनमुक्तीची भावना निर्माण व्हावी,ड्रग्ज पासून लोक जागरूक व्हावेत,आणि कायद्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यांनी व्यसनमुक्ती, ड्रग्ज विरोधात "ड्रग्जचा रस्ता अंधारात नेतो संयमाचा रस्ता उजेडात फुलवतो" "नशा नाही दिशा हवी" "अंमली पदार्थापासून दुर रहा आयुष्य सुंदर करा" "𝘋𝘳𝘶𝘨𝘴 𝘥𝘦𝘴𝘵𝘳𝘰𝘺 𝘥𝘳𝘦𝘢𝘮𝘴... 𝘊𝘩𝘰𝘰𝘴𝘦 𝘺𝘰𝘶𝘳 𝘧𝘶𝘵𝘶𝘳𝘦 𝘸𝘪𝘴𝘦𝘭𝘺" हा समाजप्रबोधनाचा एक प्रेरणादायी जनजागृतीपर संदेश दिला.समाजाला आरसा दाखवणारा व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा हा जनजागृतीपर अनोखा संदेश तामलवाडीसह परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
तामलवाडी पोलिसांनी बाप्पाची विसर्जन मिरवणूक एक दिवस उशिराने काढत, ती केवळ नाचगाण्यापुरती न ठेवता समाजासाठी संदेश देणारी बनवली.लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
समाजप्रबोधनपर व्यसनमुक्ती व ड्रग्जविरोधात फलकाद्वारे संदेश देताना तामलवाडी पोलीस कर्मचारी....या मिरवणूकीत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोकुळ ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, ठाणे अंमलदार संजय राठोड, गोपनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर, पोलीस कर्मचारी सुरज नरवडे, आबा तोगे, मिथून गायकवाड, उमेश माने, गोपाळ सलगर, नितीन भोसले,धोंडिबा जाधव,मेटे, नजीर बागवान, जुबेर काझी,संतोष पवार,अमोल पवार, नेताजी गिजगे, महिला कर्मचारी वैशाली कोरे, शितल घोडके, संज्योती कदम,राजकन्या शिनगारे,शांता कंदले, कलंमदाने आदींनी सहभाग घेतला होता.
0 Comments