Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुजारीनगरमधील गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप


तुळजापूर/उमाजी गायकवाड
 तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगर गणेशोत्सव मंडळातील गणरायाला शनिवार दि. 6 रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर पुजारी नगरमधील गणेश भक्तांनी हलगीच्या निनानात गुलालाची मुक्त उधळण करीत, पुजारी नगर लिखित एक सारख्या पारंपारिक वेशभूषात आपल्या लाडक्या गणरायाला लातूर रोडवरील पाचु़ंदा तलावात भावपूर्ण निरोप दिला.

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणूकीवर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जागेवरच हलगीच्या निनादात,मंडळातील सर्व सदस्यांनी,लहान मुलांनी विविध गितांवर नृत्य व गुलालाची उधळण करीत "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या " च्या जयघोषात अतिशय साध्या पध्दतीने गणराया निरोप दिला. 

     पुजारी नगर गणेश मंडळाची सुंदर मुर्ती...

हलगीच्या निनानात व चित्रपट गितांवर मोठ्या जल्लोषपुर्ण वातावरणात मंडळातील तरुण,लहान मुले थिरकत होती.एकीकडे अनेक मंडळाकडून मिरवणूकीवर अवाढव्य खर्च केला जात असताना येथील पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाने मिरवणूकमुक्त विसर्जन करुन गणरायाला निरोप देऊन एक आदर्श ठेवला आहे. 

विशेषत: दुपारनंतर तुळजापूरातील गणेशभक्तांनी लातूर रोडवरील पाचुंदा तलावातील विसर्जनस्थळी गर्दी केल्याचे दिसून आले. विसर्जणासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने तलावाच्या  ठिकाणी कर्मचार्‍यांचीही नेमणूक करण्यात आली होती. गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.त्याचबरोबर निर्माल्यासाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी निर्माल्य तलावपात्रात न टाकता, निर्माल्य जमा करावे,असे आवाहन नगरपालिका व पोलीस प्रशासनामार्फत यावेळी करण्यात आले होते.

अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूकमुक्त विसर्जन करण्यासाठी यांनी घेतला पुढाकार

अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूकमुक्त विसर्जन न काढण्यासाठी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार,उपाध्यक्ष प्रतिक कांबळे,कोषाध्यक्ष अँड.राज राठोड, जेष्ठ मार्गदर्शक व मंडळाचे आधारस्तंभ विश्वनाथ पुजारी,कोषाध्यक्ष आबा पुजारी,राहुल जाधव,बापु जगदे,सिध्देश्वर इंगोले, सतिश खोपडे,सोमनाथ पुजारी,बाबु पुजारी, महेश पुजारी, प्रतिक मोरे,कुणाल गायकवाड, शिवशंकर म्हमाणे, गुरुनाथ ठणके,वैभय ताटे,प्रभाकर नलावडे, समाधान मार्तंडे, रमेश येलम,रितेश कवडे,गणेश जांबळे,अप्पासाहेब घोडके, कैलास जमादार, शंतनू औंढे,विठ्ठल नाईक,मल्लेश विभूते,कुमार गायकवाड, दिपक चौगुले आदी मंडळातील सदस्यांनी पुढाकार घेतला होता.

जल्लोष करताना पुजारी नगरमधील गणेश भक्त

क्रेनच्या सहाय्याने गणरायाचे विसर्जन...

Post a Comment

0 Comments