काटी/उमाजी गायकवाड
एक कार्यप्रवर्तक शिक्षक सर्व समस्यांवर उपाय करीत असतो आणि विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे निरीक्षण करतो, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांच्यातील विचारांना प्रोत्साहन देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. ज्ञानार्जन किंवा शिकणे ही एक सक्रिय प्रणाली आहे़. त्या प्रमाणे विद्यार्थ्यांतील आंतरीक प्रतिभा,क्षमता आणि गुण ओळखून त्यांच्यातील शिकण्याची उत्सुकता नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता,नवीन ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा अशी विद्यार्थ्यांतील बलस्थाने ओळखूनच शिक्षकांने अध्यापन करावे असे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी मल्हार माने यांनी कुंभारी येथे केले. तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील वसंतभारती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार दि. 6 रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभारीच्या सरपंच वर्षाराणी वडणे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, धाराशिव बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने,वसंत भारती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड.मैना वडणे,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चिलवंते, केंद्रप्रमुख संजय वाले, काटी येथील केंद्रप्रमुख हनुमंत कदम,ॲड विष्णू डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना उपशिक्षणाधिकारी माने म्हणाले की, "एक प्रतिभावान शिक्षक आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या भविष्यातील आशा आणि स्वप्ने पाहण्यासाठी महत्वाचा घटक असतो". विद्यार्थ्यांच्या सध्याच्या समजून घेण्याच्या स्थितीप्रमाणे उपयुक्त ठरेल अशा प्रकारे शिक्षकांनी शिक्षण द्यावे असे आवाहन करुन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्वाचे स्थान असून शिक्षक,बालक आणि पालक यांच्यातील यांच्यात सुसंवाद असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
वसंतभारती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने या गुरुजनांचा केला सन्मान...
यावेळी सुहास भोसले,रामराज भड,अब्दुलमज्जीद शेख,सागर मोहिते,सावता माळी,अमोल मगर, रमेश सोनवणे, गायत्री ताकमोगे, प्रविण जाधव,अमोल गायकवाड, विजयकुमार गायकवाड,इर्शाद शेख,वासंती गायकवाड,विठ्ठल गावीत,पोपट सुरवसे,केदारी इंगळे,नागनाथ वडणे,तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे या शिक्षकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल,फेटा पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांनी केले सुत्रसंचलन विठ्ठल नरवडे यांनी तर आभार प्राचार्य सुहास वडणे यांनी मानले
यावेळी कुंभारीच्या सरपंच वर्षाराणी वडणे, उपशिक्षणाधिकारी मल्हारी माने,तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, धाराशिव बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने,वसंत भारती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड.मैना वडणे,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चिलवंते, केंद्रप्रमुख संजय वाले, काटी येथील केंद्रप्रमुख हनुमंत कदम,ॲड विष्णू डोके,प्राचार्य सुहास वडणे,पोलीस पाटील विठ्ठल वडणे, मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी,राऊ पाटील,रुक्मीणी वडणे बेबीसरोजा माने,ॲड.सुजाता माळी,अनिता काळुंके, व्यंकट वडणे,वैभव वडणे, आकाश वडणे, वास्तव वडणे,सुशांत वडणे,विरज्ञा वडणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments