Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळ आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; सौ.मिरा घो़ंघते ठरल्या होम मिनिस्टरच्या विजेत्या

  प्रथम पारितोषिक विजेत्या सौ.मिरा बापू घोंघते पारितोषिक स्विकारताना उपस्थित मान्यवरासमवेत

तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील गतवर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवार दि.5 रोजी सायंकाळी 7:30 ते 11 या कालावधीत  पुजारी नगर व परिसरातील महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा,त्यांचे मनोरंजन व्हावे, पुजारी नगरमधील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा,आणि गौरी गणपतीच्या भक्ती सेवेतून त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार, उपाध्यक्ष प्रतिक कांबळे,कोषाध्यक्ष अँड.राज राठोड, आबा पुजारी, राहुल जाधव, बापु जगदे,सिध्देश्वर इंगोले,बाबु पुजारी सौ.शुभांगी गणेश पुजारी यांच्यासह मंडळातील सदस्यांच्या पुढाकारातून "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महिलांनी देखील या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

द्वितीय पारितोषिक स्विकारताना प्रिया कोळेकर..
 
गणेशोत्सवानिमित्त खास महिलांसाठी आयोजित केलेल्या "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" या कार्यक्रमास पुजारी नगरमधील महिलांचा उदंङ प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत खास विजेत्या महिलांसाठी वाशिंग मशीन,पैठणी,एलईडी टी.व्ही.सोन्याची नथ,चांदीचा करंड,कुकर,इलेक्ट्रिक शिगडी,वाँटर प्युरिफायर अशी एकाहून एक सरस आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली होती. 

तृतीय पारितोषिक स्विकारताना महादेवी सावळे...

पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश फेस्टिवल अंतर्गत लहान मुलांसाठी स्पर्धा,अन्नदान, रक्तदान,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरती, प्रसाद वाटप, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या दहाव्या दिवशी पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" या स्पर्धच्या विजेतेपदाचा मान सौ.मिरा बापू घोंघते यांना मिळाला त्यांना प्रथम पारितोषिक वाशिंग मशिन व पैठणी मिळाली तर सौ.प्रिया कोळेकर या उपविजेत्या ठरल्या त्यांना द्वितीय पारितोषिक पैठणी मिळाली. तृतीय पारितोषिक 32 इंची एलईडी टिव्ही सौ.महादेवी सावळे यांना तर चतुर्थ बक्षिस सोन्याची नथ स्वाती थोरात यांना मिळाली.

चतुर्थ बक्षिस सोन्याची नथ स्विकारताना स्वाती थोरात...

श्री गणरायाच्या आरतीनंतर लकी ड्राँ ने काढलेल्या सोडतीत प्रथम पारितोषिक वाटर प्युरिफायर सौ.दिपाली सोमनाथ पुजारी यांना, द्वितीय पारितोषिक कुकर सौ.विशाखा चव्हाण, तृतीय पारितोषिक इलेक्ट्रिक शिगडी सौ.सपना क्षिरसागर तर चतुर्थ पारितोषिक चांदीचा करंड सौ.केशर आवताडे यांना मिळाला. स्पर्धेनंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सौ.शुभांगी पुजारी व प्रिया विजय गंगणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी पुजारी नगरच्या महिला अध्यक्षा सौ.शुभांगी पुजारी, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार,बापु जगदे,कोषाध्यक्ष आबा पुजारी यांच्या हस्ते आई तुळजाभवानी प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पुजन करताना सौ. शुभांगी गणेश पुजारी, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार, कोषाध्यक्ष आबा पुजारी, बापु जगदे, महेश पुजारी आदी मान्यवर....

नामवंत अँकर स्वेता झंवर प्रस्तुत "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" या स्पर्धेला पुजारी नगरमधील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्वेता झंवर यांनी कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी मनोरंजनात्मक विविध खेळ घेतले. 

गणेशोत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांसाठी गणेशभक्ती, सांस्कृतिक विविधता आणि उत्साह यांचा उत्तम संगम 
         सौ. शुभांगी गणेश पुजारी,
          पुजारी नगर,तुळजापूर

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्ती,सांस्कृतिक विविधता आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या होम मिनिस्टर स्पर्धेमुळे पुजारी नगर मध्ये सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास पुजारी नगरमधील सौ.शुभांगी पुजारी यांनी व्यक्त करीत पुजारी नगर तसेच परिसरातील महिलांमध्ये या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले.

लकी ड्राँ द्वारे सोडतीमधील प्रथम पारितोषिक वाँटर प्युरिफायर स्विकारताना सौ.दिपाली सोमनाथ पुजारी.....

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सौ.शुभांगी पुजारी यांनी  सूत्रसंचालन स्वेता झंवर यांनी केले. तर आभार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ.शुभांगी पुजारी यांनी अँकर स्वेता झंवर यांचा सत्कार करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अँकर स्वेता झंवर यांचा सत्कार करताना....

होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमातील सहाभागी महिला...

          स्पर्धेतील सहभागी महिला......

  पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान उपस्थित महिला...

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments