धाराशिव - राज्यातील आणि जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धाराशिव या संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजाराची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, धाराशिव शाखेचा 51हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी या नावाने उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याकडे यासुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमाद्वारे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार घेतला आहे.यावेळी संस्थेचे तज्ञ संचालक हनुमंत भुसारे , त्रिंबक कपाळे , संस्थेच्या अध्यक्षा जयश्री भुसारे , सचिव संजीवनी कपाळे ,संचालिका अनिता चिल्हाळ ,व्यवस्थापिका सविता विभुते,कर्मचारी सागर नलावडे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या दु:खात समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावला पाहिजे. आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था सदैव समाजसेवेच्या कार्यात पुढाकार घेत राहील असे चेअरमन भुसारे व सचिव कपाळे यांनी यावेळी सांगितले .
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड,
9923005236
0 Comments