तुळजापूर :- तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे तुळजापूर शहरातील प्रसिद्ध तुळजापूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व यशराज दातांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 1 या कालावधीत दिपावली सणाचे औचित्य साधून मोफत दंत आरोग्य तपासणी शिबीर व सवलतीच्या दरात उपचाराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तुळजापूर शहरातील प्रसिद्ध यशराज दातांचा दवाखाना चे डेंटिस्ट डॉ.राजेश विलास पाटील दहिवडीकर व डॉ.प्रिया राजेश पाटील दहिवडीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद प्रशालेजवळील बचाटे क्लिनिकमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात दंत आरोग्याच्या सुविधांची कमतरता भासू नये, शिबिराच्या माध्यमातून सामान्य दातांच्या समस्यांचे निदान आणि उपचार केले जावेत,दंत चिकित्सा सेवांचा लाभ व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सवलतीच्या दरात दंत रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती डॉ. राजेश पाटील दहिवडीकर यांनी दिली असून या शिबिरात भाग घेणाऱ्या
ग्रामीण भागातील लोकांसाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सांगितले.
या शिबिरात दंत आरोग्याबद्दल व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच दातांच्या सामान्य समस्या, सडलेले दात किंवा मसूड्यांचे आजार आदी विविध समस्यावर तपासणी व निदान केले जाणार असून सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत.
या शिबिरात दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments