Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राष्ट्रीय महामार्ग कामात दिरंगाई, डॉ. रामलिंग पुराणे यांचा मंगळवारपासून आलूर येथे आमरण उपोषण आंदोलन

मुरूम:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब मुरूम मोड ते मुरूम -आलूर -बोळेगाव मार्गे अक्कलकोटला जोडणारा रस्ता काम घिसाड घाईने उरकण्यात आले त्यामुळे रस्त्यावर ठिठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचबरोबर आलूर -बोळेगाव रस्ता काम अद्याप प्रलंबित असल्याने वाहतुकीस, नागीरकांना त्रासाना सामोरे जावे लागत आहे, याबाबत समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी १४ सप्टेंबर रोजी सदरील प्रलंबित रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करीत संबंधित विभागाला रस्ता काम तात्काळ पूर्ण करावी अशा मागणीचे पत्र दि. १८. ०९. २०२५ व दि. ०६ ऑक्टोबर रोजी ईमेलच्या माध्यमातून केली होती अन्यथा दि. १४ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा ईशारा पत्रात दिला होता. सदरील निवेनाबाबत संबंधित विभागानी दखल घेऊन दि. ०८ ऑक्टोबर रोजी डॉ. पुराणे यांना पत्र पाठवून उडवा उडविचे उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते, सदरील पत्रात १३०० मीटर अंतराचा रस्त्याबाबत काही शेतकऱ्यांनी मावेजासाठी जनहितयाचिका दाखल केली असून न्याय प्रविष्ट विषय आहे तरीही आम्ही काम पूर्ण करण्यास तयार आहोत मात्र पोलीस प्रशासनास पोलीस बंदोबस्तसाठी मागणी केली असून अद्याप बंदोबस्त देण्यात आली नाही असे पत्रात नमूद आहे. डॉ. पुराणे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असून दि. ०८ रोजीच्या संबंधित विभागाच्या पत्राला दि. ०९ रोजी प्रतिउत्तर देऊन आमची मागणी ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे व आलूर-बोळेगाव रस्ता काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत असून आपल्या स्तरातून वेळ मारून नेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आपल्या ह्या दिरंगाई मुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि आपल्या विभागाला किंवा संबंधित गुत्तेदाराला नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाचे काही देणेघेणे नाही असे दिसून येते, त्यामुळे आम्ही आपणास एक महिन्याची कालावधी दिली होती मात्र आपल्याकडून ठोस पावले उचलण्यात आली नाहीत अशा अशायाचा पत्र पाठवून १४ ऑक्टोबरला आलूर येथे बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात होईल आणि त्यास शासन, प्रशासन, संबंधित विभाग, गुत्तेदार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. 

भीषण अपघात झाला तर जबाबदार कोण?
                                -डॉ.रामलिंग पुराणे
२०२३ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब रस्ता काम घिसाड घाईने उरकण्यात आले आहे, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर आलूर -बोळेगाव १३०० मिटरचा रस्ता काम मात्र अद्याप करण्यात आला नाही, एकीकडे विषय न्याय प्रविष्ट आहे असे म्हणतात तर दुसरीकडे पोलिस बंदोबस्तात काम करू असे म्हणतात, मुळात विषय न्याय प्रविष्ट जर असेल तर मा. न्यायालयाने काम करू नका असे स्थगिती दिली आहे का? सदर पत्रामध्ये रीट पिटीशन १३२६९/२०२२ यामध्ये स्थगिती आदेश दिल्याचे मला कार्यकारी अभियंता पत्र क्रमांक २६९३ च्या पत्रानव्ये कळविले नाही, व तसे ठोस कागदपत्रे ही उपलब्ध नसल्याचे दिसून येते, फक्त हा विषय समोर ठेऊन कोठेतरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न दिसून येत आहे आणि त्यांच्या ह्या दिरंगाई मुळे नागरिकांना त्रास सोसावे लागत आहे, या रस्त्यावरून श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला जा ये करणारे प्रवाशी, शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी सह शासकीय वाहनांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो,यदाकदाचित यां रस्त्यावर भीषण अपघात घडला तर याला जबाबदार कोण? शासन, प्रशासन, संबंधित विभाग की गुत्तेदार? विषय न्यायालयात असले तर आम्हीही सन्मानपूर्वक न्यायांची प्रतीक्षा करू मात्र न्यायालयाने संबंधित रस्ता काम न्यायालयीन कामकाज पूर्ण पडे पर्यंत थांबवावे असे आदेश दिले असेल तर त्याचा आम्ही पालन करू पण सद्या न्यायालयामध्ये कुठेही स्थिगिती आदेश असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांवर होणाऱ्या अन्यायला न्याय केंव्हा मिळणार..?व त्याचबरोबर मावेजा साठी मागणी करणाऱ्या शेतकरी बांधवाना कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्याकडून पैसे कधी मिळणार आणि रस्ता कधी होणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.
डॉ.रामलिंग पुराणे,
समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान

Post a Comment

0 Comments