मुरुम/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य प्राप्त करणे गरजेचे आहे, विद्यार्थ्यांनी बँकिंग फायनान्स तसेच उद्योग सेवा क्षेत्रामध्ये असलेल्या करिअर संधी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य अंगीकृत करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री नरेश गडम यांनी प्रतिपादन केले. ते दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले तर प्रमुख उपस्थित म्हणून श्री अजित काळे जनसंपर्क अधिकारी भारतीय स्टेट बँक यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी कॉमर्स विभागात वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो .तसेच महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या साठी अनेक उपक्रम चालवले जात आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अजित आष्टे यांनी प्रास्ताविक केले. तसेच वाणिज्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. विजयकुमार मुळे, प्रा. मनोज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सुरज सुरवसे, ऋतुजा गायकवाड, प्रियंका इंगळे ,सना चौधरी, सुरज उमर्गी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी गायकवाड तर आभार प्रदर्शन कु. सानिका जाधव यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ. खंडू मुरळीकर, प्रा. ओम प्रकाश पवार प्रा. संध्याराणी चौगुले प्रा. अक्षता बिराजदार प्रा. विद्या गायकवाड प्रा. सचिन गायकवाड तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments