मुरुम/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी पतxसंस्था फेडरेशन, मुंबई आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण व दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर कुमठा, डेनिसन्स रिसॉर्ट येथे आयोजित रविवारी (ता.१२) रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध पतसंस्थांना राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सन २०२४-२५ चा मुरुमच्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे सर्वोत्कृष्ट व दिशादर्शक कार्य केल्याबद्ल १० कोटी ते ५० कोटीच्या दरम्यान झालेला पारदर्शक व्यवहार, वाढते भागभांडवल, विविध योजना, सामाजिक योगदान व वसुली. त्यांच्या या कार्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, महासचिव शशिकांत राजोबा, संचालक डॉ. संजय ओसमठ यांच्या हस्ते पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव आदिंचा आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व मानाचा दुप्पटा देवून मराठवाडा विभागातून सहा वेळा दिपस्तंभ पुरस्कार देवून मान्यवरांनी सन्मानित केले. सदर पतसंस्थेला या अगोदर पाच वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येवून हा सहावा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या त्यांच्या अविस्मरणीय यशाबद्ल संस्थेचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी वृंद आदिंनी फटाके वाजवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.
0 Comments