काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील इदगाह मैदानासमोरील खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास फंडातील निधीतून दहा लाख मंजूर झाले.
काटी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे,तालुकाध्यक्ष महादेव जाधव, माजी सरपंचआदेश कोळी, अनिल गुंड,तन्वीर काझी, दादा बेग,भाजपचे तालुका उपाध्यक्ष मकरंद देशमुख, अहमद पठाण,चंद्रकांत काटे, हेरार काझी आदी पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि.28 रोजी गावातील विकास कामांसाठी भेट घेतली असता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तात्काळ त्यांच्या स्थानिक विकास अंतर्गत फंडातून दहा लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र भाजप पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सुनिल (भाऊ) बनसोडे,तालुकाध्यक्ष महादेव जाधव,माजी सरपंच आदेश कोळी,अनिल गुंड,तन्वीर काझी,दादा बेग,भाजपचे तालुका उपाध्यक्ष मकरंद देशमुख, अहमद पठाण,चंद्रकांत काटे,हेरार काझी,नजीब काझी, रब्बानी कुरेशी, मंजूर कुरेशी आदीजण उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा
Only न्यूज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments