Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आमदार राणा (दादा)जगजितसिंह पाटील वाढदिवस विशेष.... विकासाचा महामेरू,लोकभिमुख नेतृत्व:आ.राणादादा पाटील

काटी:-धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र , माजी राज्यमंत्री तथा तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना विकासाचा महामेरू,लोकभिमुख नेतृत्व म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . त्यांना त्यांचे वडील तथा राज्याचे माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचे धडे मिळाले.

अतिशय शांत,संयमी, संवेदनशील, सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे,कोणत्याही प्रश्नाला  न्याय देणारे, दूरदृष्टीने विचार करून जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी विविध संकल्पना  मांडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे  विकासाभिमूख नेतृत्व म्हणून आ.राणा (दादा) पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या कार्यतत्परतेने एक वेगळा ठसा उमटविला आहे. 

धाराशिव जिल्हयासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसाठी  आ.पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरवा करून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेतला आहे.त्या अनुषंगाने कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या 23 टीएमसी पैकी 7 टीएमसीचे  काम पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे वाहून जाणारे पाणी देखील धाराशिव जिल्हयात आणून संपूर्ण जिल्हा सुजलाम,सुफलाम व्हावा यासाठी देखील राणादादा शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे येतात. तीर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास व्हावा,या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळावी यासाठी देखील राणादादा सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कोटयवधी रुपयाची विकास कामे होत आहेत. या भागात दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, या भागातील औद्योगिक विकास व्हावा यासाठी देखील राणादादा यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कोटयवधी रुपयाचा निधी खेचून आणला आहे.

                                 (संग्रहित छायाचित्र)
धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्यासह केंद्र शासनाचा निधी मिळविण्यात आ.पाटील यांनी यश मिळविले आहे.  या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने तर 3295 कोटी रुपयाच्या सुधारीत कृती आराखड्यास मान्यता दिली आहे.धाराशिव येथे रेल्वे जंक्शन , ब्रॉडगेड रल्वे मार्ग,प्रवाशासाठी सोयी सुविधा यातून निर्माण होणार आहेत. धाराशिव तालुक्यातील कौडगाव व वडगाव (सि .) एमआयडीसी, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील एमआयडीसी विकसीत करून  बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी देखील आ . पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. तसेच तुळजापूर तालुक्यातील काटी येथे आरोग्य उपकेंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,संत सेना महाराज सभामंडप, इदगाह समोरील मोकळ्या जागेवर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी नुकताच स्थानिक विकास अंतर्गत फंडातून दहा लाखांच्या मंजुरी पञ दिले, माळी समाजासाठी सभा मंडप, गाव अंतर्गत रस्ते, सांगवी ते सावंतवाडी पर्यंतच्या रस्त्यासाठी 21 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून सांगवी ते काटी पर्यंतच्या डांबरीकरणाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे.

ठिकठिकाणचे रस्ते,महामार्ग कामे,सिंचन योजना यासाठी देखील आ.पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.संकटग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा,शासकीय अनुदान मिळावे यासाठी देखील आ.पाटील यांनी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा,उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आ. पाटील यांनी धाराशिव येथे नौकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा घेतला.यातून हजारो हातांना रोजगाराची संधी मिळाली.जिल्हयातील पर्यटन स्थळे विकसीत करण्यासाठी देखील आ.पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.अतिवृष्टी व पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आपल्या मुले व मुलींचे लग्न कसे करावे ? असा प्रश्न निर्माण झाला होता.त्या अनुषंगाने आ.पाटील यांनी जिल्ह्यात सर्व 8 तालुक्याच्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात सामुदायिक,सर्वधर्मीय विवाह सोहळा घेण्याचा निर्णय घेतला.धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे करून जिल्हावासीयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली.आ.राणादादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव,तुळजापूर नव्हे तर जिल्ह्याचा चौफेर विकास होत आहे. आ.राणादादा यांचा आज गुरुवारी (दि .३०) वाढदिवस आहे. त्यांना काटी जिल्हा परिषद गटातील सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व अशा लोकभिमूख नेतृत्वाला उदंड आयुष्य मिळो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या चरणी प्रार्थना.

शुभेच्छुक :- मकरंद बापुसाहेब देशमुख
                तालुका उपाध्यक्ष भाजपा
            रा.काटी ता.तुळजापूर जि.धाराशिव

Post a Comment

0 Comments