Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मा.बसवराज पाटील चेअरमन यांच्या हस्ते श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

मुरूम/प्रतिनिधी 
मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यागा हंगाम २०२५-२६ साठीया बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर आज रोजी माजी मंत्री, अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, लातूर जिल्हा (ग्रामीण) व आपल्या कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे कामकाज मा.श्री बसवराज पाटील याच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरू असून चालू हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.

यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून जवळपास १४००० हेक्टर उत्साची नोंद झालेली आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाने ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चीत केले आहे. यासाठी पुरेशी ऊसतोड व वाहतुक यत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम पुढील आठवडयात होणार आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देण्यात येणार असून कोणाचाही ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बसवराज पाटील यांनी यावेळेस दिली. याप्रसंगी मा.श्री. बापुराव पाटील, चेअरमन धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,धाराशिव, कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री.सादीकसाहेब काझी, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री. शरण पाटील तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री शरणप्पा पत्रिके, अॅड. सुभाषराव राजोळे, अनिल सगर, रहेमान जमादार, गोविंदराव पाटील, भालचंद्र लोखंडे, शरणप्पा कबाडे, सचिन पाटील,

केशवराव पवार, माणिकराव राठोड, विठ्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, अॅड. संजय बिराजदार, अॅड. विरसंगप्पा आळगे तसेच मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य राम सोलंकर, प्राचार्य अशोक सपाटे, रशिद शेख, प्रा. शौकत पटेल, नाना सुर्यवंशी,

योगेश राठोड, रफिक तांबोळी, मनोहर सास्तुरे, प्रल्हाद काळे, प्राचार्य उल्हास घुरघुरे, शरण पाटील व्होर्टीकर, हेमंत पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. एस. आर. गवसाणे व सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments