Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती

मुरुम/प्रतिनिधी
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती 'पुस्तक वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात आली.
      
प्रारंभी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. मल्लिनाथ दंडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम सोलंकर, डॉ.आर.एस.रामशेट्टी, प्रा. आर.पी.जकाते, प्रा.तात्याराव चव्हाण, प्रा. रवींद्र जोजन, डॉ.लक्ष्मण बिराजदार, प्रा.पी.डी. कांबळे, प्रा. सुबोध कांबळे, प्रा.ग्रंथपाल अखिल शेख यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. 
     
यानंतर महाविद्यालयातील सर्वच वर्गामध्ये व ग्रंथालयात दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथांचे वाचन केले. यात इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी ,प्राध्यापक ,कर्मचारी सहभागी झाले होते. 
अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्याबरोबरच विविध संतांचे साहित्य, कथा ,कादंबऱ्या , कविता यांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले.

Post a Comment

0 Comments