Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न


मुरूम प्रतिनिधी
 तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आयोजित “तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम” अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे १०० तुळशी वृंदावनांचे वाटप करण्यात आले.

हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. तुळशीचे आयुर्वेदातही महत्वाची वनस्पती म्हणून महत्व विशद करण्यात आलं आहे.

हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. तुळशीचे आयुर्वेदातही महत्वाची वनस्पती म्हणून महत्व विशद करण्यात आलं आहे. भगवान विष्णूची अत्यंत प्रिय रास आणि माता लक्ष्मीचं निवासस्थान म्हणूनही तुळशीच्या रोपाकडे पाहिलं जातं. अशात तुळस घरोघरीही पूजली जाते. तुळशीचे रोप घरात लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते, असे विज्ञानही मानते.
       
या कार्यक्रमाचे ठिकाण विठ्ठल मंदिर, विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना जवळ, मुरूम येथे धार्मिक विधी, तुळशी पूजन आणि हरिनाम संकीर्तनाने भक्तीचा माहोल निर्माण झाला होता.
        
या प्रसंगी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष रोटे प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, तसेच रोटे संतोष कांबळे, रोटे सुनिल राठोड, रोटे भूषण पाताळे, रोटे प्रकाश रोडगे, रोटे डॉ. नितीन डागा, रोटे राजाराम वाकडे, रोटे डॉ. महेश स्वामी, रोटे अ‍ॅड. उदय वैद्य, रोटे सुधीर पंचगल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
      
या उपक्रमाच्या माध्यमातून “सेवा हीच खरी पूजा” या ब्रीदवाक्याखाली रोटरी क्लबने समाजात श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
        
रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आयोजित हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित नागरिक आणि मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments