Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

देवराज मित्र मंडळ,समाजवादी पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकदीने उतरणार पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या बैठकीत लोकनेते रोचकरी यांची माहिती

तुळजापूर-देवराज मित्र मंडळ व समाजवादी पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा समाजवादी पक्षाचे लोकनेते देवानंद (भाऊ)रोचकरी यांनी दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवराज मित्र मंडळ तुळजापूर तालुका व समाजवादी पार्टीच्या वतीने तुळजापूर तालुक्यात ठीक ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी श्री रोचकरी बोलत होते.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पालिका निवडणुकीच्या बाबतीत बोलताना लोकनेते श्री रोचकरी म्हणाले , देवराज मित्र मंडळ व समाजवादी पार्टी जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर पालिकेच्या निवडणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग वाईज बैठका घेण्यात आल्या आहेत. 

यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण व  नगर पालिकेच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी  मागणी अर्ज पक्षाचे लोकनेते देवानंद (भाऊ)रोचकरी व  समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी यांच्याकडे सादर केले आहेत. 

देवराज मित्र मंडळ व समाजवादी पार्टीच्या माध्यमातून लवकरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन निवडणुकीचे रणसिंग फुंकण्यात येणार असल्याची माहितीपक्षाचे लोकनेते श्री रोचकरी यांनी सांगितली. आगामी निवडणुकीचे अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळून जोमाने काम करावे असे आवाहनही यावेळी श्री रोचकरी यांनी केले.

या बैठकीस समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी,पक्षाचे जिल्हाध्यक्ष लिंगया स्वामी महाराज,  देवराज मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष ॲड.उदय भोसले, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव,हनुमंत जाधव,सर्जेराव लोमटे, दिलीप लोमटे,रामदास पवार, बाळासाहेब कदम,लक्ष्मण नवगिरे,दत्ता बिराजदार यांच्यासह  मित्र मंडळ व पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments