धाराशिव- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील रहिवासी तथा युवासेनेच्या राज्य उपसचिव मनिषा वाघमारे यांची समाज कार्यातील अग्रेसर,धाडसी नेतृत्व म्हणून
जिल्हाच नव्हे तर राज्यभर ओळख आहे . त्या धाराशिव जिल्हा परिषदची निवडणूक कळंब तालुक्यातील खामसवाडी गटातून लढविणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवासेनेच्या राज्य उपसचिव म्हणून कार्यरत असताना वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची चुनक धाराशिव जिल्हाच नव्हे तर राज्याने पाहिली आहे.धाराशिव जिल्ह्यात व राज्यात करोना संकट असताना त्या मोठ्या धाडसाने कोरोना ग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्या .
मराठवाडयासह राज्यात अतिवृष्टी व पूररिस्थीती असताना त्या या संकट काळात पूरग्रस्तांनाच्या मदतीला धावून गेल्या.गोरगरीब संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांपर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पोहचवली. सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने त्यांनी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले.सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षित केले.नोकर भरती मेळावा घेऊन जिल्ह्यातील व राज्यातील हजारो तरुण,तरुणी यांना पुणे,मुंबई येथे नोकरी मिळवून दिली.युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात व राज्यात खेडोपाडी युवकांचे संघटन वाढवण्याचे उत्कृष्ट कार्य करून त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादित केला आहे. युवक व युवतीसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सुशिक्षित युवक व युवतीची मोठी फळी त्यांच्या सोबत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून ते सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.सामाजिक बांधिलकी,समाजातील विविध प्रश्नाविषयी त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता , सामाजिक बांधिलकी,संकटग्रस्त,गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व अशी ओळख त्यांनी आपल्या कर्तृत्व व कार्य तत्परतेने समाजमनात बिंबवली आहे.
जि.प.च्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसमान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व सामान्य जनतेच्या जनरेट्यामूळे पक्ष प्रमुख,लोकप्रतिनिधी,नेते यांच्या मार्गदर्शनात वाघमारे यांनी धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधून प्रचार कार्यही सुरू केले आहे.
0 Comments