मुरुम/प्रतिनिधी
आष्टा कासार -ता. लोहारा-येथील पद्मावती देवी मंदिराची यात्रा आज मोठ्या उत्साहाने पार पडली. प्रारंभी पद्मावती देवी ची पालखी व भव्य मिरवणूक सवाद्य काढण्यात आली होती. जैन धर्म की जय, पद्मावती देवीचा जयजयकार करत, देवीच्या गाण्यावर नाचत गात मनोभावे पूजा करण्यात आली. यावर्षी अतिरिक्त पावसामुळे पद्मावती देवी मंदिराचे बांधकामांचे जिर्णोद्धार करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला व लागलीच त्या कामाची भूमिपूजन करण्यात आले. यावेळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक नेमिनाथ राव आगर थडे, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते रतिलाल आगरथडे, जिनदास पाटील ,पार्श्वनाथ आगरखेड ,सचिन खोबरे, सुनील भस्मे, अभिनंदन आगरथडे ,विलास वराडे, अभिनंदन भस्मे, सचिन आगरखेड,वसंतराव आगरखेड, प्रदीप आगरथडे, राजेंद्र आगरथडे, तसेच कासार जैन समाजातील अनेक महिला भक्तगण उपस्थित होते. यावर्षी पद्मावती देवी मंदिर ची यात्रा संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद करण्याचा कार्यक्रम राजकुमार आगरखेड यांनी केला.
0 Comments