Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरपीआय पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणार! एक नेता एक पक्ष एक झेंडा प्रमाण मानून काम करणारा निष्ठावान कार्यकर्त्याची मागणी

तुळजापूर- स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीत महायुतील मित्र पक्षाकडे रिपब्लिकन पक्षाला जागा सोडा उमेदवारी द्या अशी मागणी न करता नाही, पक्षाकडे हक्काचे निवडणूक चिन्ह
असल्यामुळे मी पक्ष नेतृत्वकडे उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असून नगरपालिका निवडणूक 
आरपीआय पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा इरादा तालुका युवक अध्यक्ष शुभम कदम यांनी बोलून दाखवला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली शालेय जीवनापासून 'एक नेता एक पक्ष एक झेंडा प्रमाण मानून सामाजिक कार्य करत
रिपब्लिकन पक्षाचा विचार ध्येय धोरण सामान्य माणसापर्यंत पोहोचवून प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतो आहे.

शालेय जीवनात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा तुळजापूर तालुकाध्यक्ष, युवक तालुका सरचिटणीस आणि सद्या  तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असून तुळजापूर शहरामध्ये विविध दैनिकात पत्रकार म्हणून काम केले आहे.

समाजाच्या अन्याय अत्याचाराला आपल्या बातमीतून वाचा फोडण्याचे सामान्य लोकांना शासनाच्या सेवा सुविधा मिळवून, प्रशासकीय  न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मी राहत असलेल्या प्रभागात, वार्डामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मी गरिब प्रामाणिक तळमळीचा पत्रकार म्हणून सामान्यातील सामान्य नागरिकांसह मी परिचित आहे.

तुळजापूर रिपब्लिकन पक्षाचा युवक तालुकाध्यक्ष तथा उच्च शिक्षित शुभम कदम यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे तुळजापूर नगर परिषदेची २०२५  सार्वत्रिक निवडणूक शहरातील प्रभाग क्रमांक २ (अ) मधून मी पक्षाचा उमेदवार म्हणून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आजपर्यंत केलेले कार्य....
महामानव बौध्दीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा,जिल्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,गोरगरीब निराधार महिलांना साड्यांचे वाटप, पारधी समाजातील बांधवांच्या कुटुंबीयांना किराणा साहित्याचे किट वाटप,पक्ष वाढीस सभासद नोंदणी सहभाग, पक्षाच्या आंदोलन, मोर्चे निदर्शने,जिल्हास्तरावरील विशेष बैठका तालुका स्तरावरील बैठका,राज्यव्यापी अधिवेशन,राज्यव्यापी मेळाव्यासह पक्षाच्या विविध कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments