Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात काळभैरव जन्मोत्सव उत्साहात साजरा; काळभैरव तुळजाभवानीचे मुख्य क्षेत्रपालभैरव चंडी यज्ञाने जन्मोत्सव साजरा

तुळजापूर:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नगरीतील श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य क्षेत्रपाल व रक्षक असणाऱ्या कालभैरवाचा जन्मोत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 

नवंग्रहांसह तंत्रविद्येचे आदीपत्य ,सृष्टीची न्यायदेवता  व काळावर प्रभुत्व असणाऱ्या या देवतेचा जन्मोत्सव साजरा करताना संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि अध्यात्म यांच्यासह कळभैरवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता  

पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनाची गर्दी झाली होती ,तर सकाळी सात वाजता भैरवाच्या पारंपरिक तेलाभिषेकाने  कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा विधी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू राहला. त्यानंतर नित्योपचार पूजा व आरती  संपन्न झाली .

त्याचबरोबर दुपारी एक वाजता श्री काळभैरवाष्टक पठणासह हवन, होम व भैरव यज्ञ पार पडला. या सोहळ्यात भैरव चंडी पाठ आणि भैरव नैवेद्य सेवा बजावण्यात आली त्याचबरोबर महाआरतीने होमहवन व भैरव यज्ञ या विधिंची सांगता करण्यात आली

नैवेद्यात पारंपरिक शाकाहारी पदार्थांमध्ये जिलेबी,वड्याच्या माळा,दही भात,बाजरीची भाकरी व भरीत आदी नैवैद्य तर ,भैरव उपासनेशी निगडित मद्य व मांसाहारी नैवेद्याचाही समावेश करण्यात आला तर ,संध्याकाळी मंदिर परिसरात रांगोळी रेखाटन आणि दीपप्रज्वलनाने वातावरण उजळून निघाले. 

तर रात्रीच्या वेळी शेकडो दिव्यांच्या प्रकाशात, पूर्वापार प्रथेप्रमाणे भैरवांना गांजाची चिलीम अर्पण करण्यात आली हा सर्व धार्मिक विधीची सेवा कालभैरवाचे मुख्य रंगनाथ नवनाथ पुजारी, विश्वनाथ नवनाथ पुजारी नागनाथ पुजारी,गणेश पुजारी यांनी बजावली. तर संजय मैदर्गी व संजय जाधव यांचे सहकार्य लाभले.

उपासना ही भक्ताला निर्भयतेचा आणि शक्तीचा अनुभव देणारी साधना आहे,” 

Post a Comment

0 Comments