Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर शुगर प्रा.लि.व श्रीवर्धन शुगरसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक चालकांना सुरक्षाबाबत तामलवाडी पोलीस व महामार्ग पोलिसांकडून प्रबोधन

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील धामणगाव रोडवरील तुळजापूर  शुगर प्रा.लिमिटेड व जवळगाव रोडवरील श्रीवर्धन शुगर प्रा.लिमिटेड गुळ पावडर  कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत, पोलीस उपनिरीक्षक जाकेर पटेल, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर बीट अंमलदार जुबेर काझी, पी.एन.गोबाडे यांनी बुधवार  दि.12 रोजी दुपारी 1 ते 2 या कालावधीत प्रत्यक्ष कारखान्यावर जाऊन कारखान्याचे कार्यकारी संचालक, सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत स्टॉपसह ट्रॅक्टर,बैलगाडी व ट्रक चालक यांना सुरक्षा बाबत, होणारे अपघात, वाहतूकीचे नियम, नियमांचे पालन न होणारी कायदेशीर कारवाई आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कारखाना ऊस वाहतूक चालक व कारखाना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ऊस वाहतुकीची ट्रक,ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी अशी वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने धावतात.प्रवास करताना किंवा उभे असताना दृष्यमान नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकींग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होऊ शकतो हे टाळण्यासाठी वाहन मालक चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिंग टेप लावावे. एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करु नये.वाहनांचा वेग योग्य मर्यादेत ठेवणे,मागील वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करु नये.वाहने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करु नये. वाहनांच्या क्षमतेबाहेर (ट्रेलरच्या दोन्ही बाजूच्या बाहेर) ऊस भरु नये. इतर वाहनांचा अंदाज घेवून शेतातून मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर/ट्रेलर आणावे. रेडियम बसवणे, टेल लाईट,इंडिकेटर बसवणे, ब्रेक लाईट,पार्किंग लाईट लावणे,ऊस भरण्याची कमाल उंची निश्चित,सध्या हिवाळा असल्याने धुक्यामुळे रात्रीची दृष्यमानताही कमी असते त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी फ्लोरोसेंट रंगातील रिफ्लेक्टीव्ह पट्ट्या असलेले आच्छादन शेवटच्या ट्रेलरवर लावल्यास अपघातांना आळा बसू शकेल.मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांच्या पालनाची जबाबदारी पालक,मालक यासोबतच माल भरणाऱ्या कारखान्यांची असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची नोंदणी तसेच चालकाकडे विमा,वाहन परवाना आदी विधीग्राह्य कागदपत्रे असल्याची खात्री संबंधित साखर करखान्यांनी त्यांच्या स्तरावर  करावी.वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघात झाल्यास 1033,112 व 108 नंबरवर फोन करावा आदी विषयांवर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वाहन चालकांचे व मालकांचे सुरक्षित वाहतूक विषयक समाजप्रबोधन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments