काटी:तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता 12 शिक्षण घेणाऱ्या कृष्णा संताजी थिटे याने लातूर येथे 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या सॉफ्ट टेनिस व लॉन टेनिस या दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यास प्रशिक्षक हेमंत कांबळे व करणं खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल प्रा. संभाजी भोसले, प्रा. नन्नवरे, प्राचार्य अशोक कांबळे,उपप्राचार्य मुकुंद गायकवाड,
डॉ. प्रविण भाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव तथा जीवन विकास शिक्षण संस्थेचे सदस्य उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Comments