Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ)रोचकरी यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश;ऐन नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या तोंडावर तुळजापूरचे राजकारण ढवळले!

अनेक कार्यकर्त्यांसह माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिदे गट) पक्षप्रवेश 

तुळजापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या तोंडावर तुळजापूर शहरातील मातब्बर समजले जाणारे समाजवादी पार्टीचे नेते तथा तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मंगळवार दि.13 रोजी शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मलबार हिल येथे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र साळवी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,राजेंद्र सापणे, शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल (बापू)शिंदे,अर्जुन सलगर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे समीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी  यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश तुळजापूरच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि समाजवादी पार्टीचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करून राजकीय ‘घरवापसी’ केली आहे.

देवानंद भाऊ रोचकरी हे तुळजापूरातील एक अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या रोचकरी यांना मानणारा एक मोठा आणि निष्ठावान मतदारवर्ग तुळजापूर शहरासह तालुक्यात आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे अनेकांना  मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.ते या निवडणुकीत महाविकासकडून नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपले काही उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरवतील अशी चर्चा सुरू होती याच दरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार याबाबत तर्कवितर्काने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांचे स्वागत करताना....

देवानंद भाऊ रोचकरी देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून देवराज मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांनी चार वेळा विधानसभेच्या निवडणुकाही लढवल्या आहेत. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून सतत तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. प्रचंड आत्मविश्वास,जिद्द, चिकाटी व दूरदृष्टी हे त्यांचे वेगळे गुण आहेत. राजकारणात त्यांना अनेकदा पराभूत व्हावे लागले असले तरी राजकारणात संघर्षाशिवाय काही मिळत नाही असं म्हटलं जातं. त्यांनी या संघर्षावर मात करून तुळजापूर सारख्या शहराचे नगराध्यक्षपद दिमाखात भूषवले.

देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे समीकरण कसे असणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. सध्या तरी रोचकरी  यांच्या अनुभवामुळे आणि गाव तिथे देवराज मित्र मंडळाच्या शाखेच्या माध्यमातून मिळालेल्या जनाधाराच्या बळावर निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू आहे.

रोचकरी  यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेत (शिंदे गट) उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या उत्साहवर्धक वातावरणात आता देवानंद  रोचकरी यांची ताकद जोडल्यामुळे पक्षाला मोठी बळकटी मिळाली असल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

तुळजापूर शहरात या महत्त्वाच्या नेत्यांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जनता शिवसेनेकडे आकर्षित होईल,अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आण्णासाहेब गुंड, महावीर मुळे, शिवाजी कांबळे, ॲड.उदय भोसले, राहुल जाधव, दिलीप लोमटे, पांडुरंग बोंगरे, सर्जेराव लोमटे, विशाल रोचकरी, हनुमंत जाधवसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments