तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे रुढी परंपरेनुसार यंदाही दि.28 डिसेंबर पासून शाकंभरी नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात येत असून बुधवार दि.31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली भव्य-दिव्य पारंपारिक जलयात्रा पापनाश तीर्थ येथून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या जलयात्रेत रथातील शाकंभरी देवीची प्रतिमा संपूर्ण भाजीपाला (शाक) व फळांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती. जलयात्रेत सहभागी सुवासिनी, कुमारिका व आराधनी यांना ५००१ जलकुंभ (कलश) तसेच २१०० साड्यांचे वाटप करण्यात आले.
या शोभायात्रेत दिंड्या,पताका, गोंधळी,आराधी,वारूवाले, धनगरी ढोल यांच्यासह प्रतिष्ठित पारंपारिक बँड,बॅन्जो पथक व तुतारी यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच अश्व (घोडे), उंट,बैलगाडी यांसारख्या पारंपारिक प्रतीकांनी शोभायात्रेचे आकर्षण वाढवले.
जलयात्रेस उपस्थित प्रत्येक भक्तांसाठी भव्य महा-अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या अन्नदानासाठी दोन दिवस आधीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. सुमारे 1100 किलो तांदूळ वापरून व्हेज पुलाव, 800 किलो गव्हाच्या पिठाच्या चपात्या, शेवग्याचे वरण, पालक भाजी, 21000 बालुशाही व खारीबुंदी, तसेच 21000 भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांची व्यवस्था करण्यात आली होती. हे सर्व आयोजन श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून स्वखर्चाने करीत आहे.
या संपूर्ण जलयात्रा उत्सवाचे आयोजन गेल्या 21 वर्षापासून श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टकडून रूढी-परंपरेनुसार अखंडपणे करण्यात येत आहे. माननीय गुरुवर्य महंत तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा व महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा यांच्या आशीर्वादाने प्रक्षालन सेवा, चरणतीर्थ सेवा,शारदीय नवरात्रात उपवासाचे पदार्थ व फळे वाटप,तसेच श्री तुळजाभवानी मंदिरातील दैनंदिन पूजेतील पारंपारिक नगाऱ्याची भव्य मिरवणूक हे उपक्रम नियमितपणे राबविले जातात.
या पारंपारिक जलयात्रा उत्सवात महाराष्ट्र शासनाचे खार जमीन विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. भरत मारुती गोगावले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास शोभा वाढवली.
महाराष्ट्र शासनाचे खार जमीन विकास मंत्री श्री. भरत मारुती गोगावले, नुतन नगराध्यक्ष विनोद पिंटू भैय्या गंगणे, तहसिलदार तथा व्यवस्थाक माया माने,
श्री तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल (भैय्या)रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, अमरराजे कदम,अमर चिवचिवे, उमाकांत रणदिवे,संतोष शिंदे, बाबासाहेब खपले,निलेश रोचकरी,आनंद सावंत,संजय कामे, गणेश धोत्रे,राम छत्रे, ऋषिकेश वराडे,मनोज माडजे, जगदीश जवजाळ,जय सावंत,जगन्नाथ शेंद्रे,दादु कामे,कृष्णा जाधव,नितिन जाधव यांच्यासह भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत भक्तीभाव, सेवा व परंपरेचा संगम असलेला हा जलयात्रा उत्सव अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडला.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं..9923005236
0 Comments