Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथे सन इंडस्ट्रीजच्या वर्धापन दिन व नववर्षा निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित गुरुपूजा सत्संग व भजन संध्या संपन्न


धाराशिव:- धाराशिव येथे गुरुवार दि. 1 जानेवारी सन इंडस्ट्रीजच्या वर्धापन दिन व नववर्ष 2026 चे स्वागत आणि या वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि मार्गदर्शनासह करण्यासाठी हा सोहळा श्री श्री रविशंकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य येथील प्रसिद्ध उद्योजक अमरसिंह देशमुख व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन इंडस्ट्रीजमध्ये एक मोठा सामूहिक गुरु पूजा आणि सत्संग सोहळा पार पडला,ज्यामध्ये श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने आनंद, शांती आणि आंतरिक सुसंवाद साधण्याचा अनुभव भक्तांना मिळाला,तसेच नवीन वर्षाची सुरुवात आध्यात्मिक पद्धतीने करण्यात आली. 

प्रारंभी उद्योजक अमरसिंह देशमुख यांनी उद्योगक्षेत्रात आलेल्या अनेक संकटांवर मात करून सन उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत उद्योग क्षेत्रात यशस्वी ठरलो असल्याचे सांगून 2018 पासून आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले.

गुरु आणि त्यांच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सामुहिक गुरु पूजा विधी व सत्संग भजन संध्या कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी कडाक्याच्या थंडीत शिकोटीचाही आनंद घेतला.

या कार्यक्रमातून आर्ट ऑफ लिव्हिंग मधील शिष्य व भक्तांनी आत्मिक शांती आणि आंतरिक संतुलन साधण्यासाठी ध्यान आणि श्वास तंत्रांचा अनुभव घेतला.  या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिष्यांसह अनेकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923085236

Post a Comment

0 Comments