Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पीएमश्री प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे बालिका दिन उत्साहात

मुरुम/प्रतिनिधी
पीएमश्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे ३ जानेवारी रोजी बालिका दिन क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या महिला सरपंच मा. श्रीमती पूजा पटवारी होत्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीदेवी पाटील, महादेव महाराज, लक्ष्मी राजपूत, मायदेवी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालिकांनी सुरेल गायन, आकर्षक नृत्य सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच मुलींनी आपल्या मनोगतांतून शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्वास व स्त्री-सक्षमीकरण यावर प्रभावी विचार मांडले.

कार्यक्रमाची प्रस्तावना साधना ताशी यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मा. बालाजी भोसले यांच्यासह सहशिक्षक सुनील राठोड, संजीव भोसले, गणेश सुंकेवार, गजानन खमीतकर, अनंत वाघमोडे, महादेव कुन्हाळे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानवी लोखंडे व कु. सोनाक्षी गायकवाड यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन कु. रिया गायकवाड यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments