Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🌟 37 वर्षांनंतर खंडाळकरवाडी शाळेत सांस्कृतिक जल्लोष; वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
 तुळजापूर तालुक्यातील खंडाळकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल 37 वर्षांनंतर प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपले अष्टपैलू कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. पालक व ग्रामस्थांनी बालकलाकारांचे कौतुक करत टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. दीर्घ प्रतीक्षेनंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पालकांनी शिक्षकवृंदांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विस्तार अधिकारी पांडुरंग खंडाळकर, श्रीकांत खंडाळकर, विकास सावंत, नवनाथ खंडाळकर, रघुनाथ खंडाळकर व अविनाश खंडाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक वैभव देशमुख तसेच सहशिक्षिका कुलकर्णी, जाधव, पवार आणि चिवडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
खंडाळकरवाडी शाळेच्या या सांस्कृतिक सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून गावकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments