Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रमेश माने यांचा 'विवेकयात्री' गौरव ग्रंथाने सन्मान; आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते दिमाखदार सेवापूर्ती सोहळा संपन्न

धाराशिव:"शिक्षकाच्या आयुष्यातील सेवानिवृत्ती हा क्षण जितका भावनिक असतो, तितकाच तो नव्या सुरुवातीचा असतो. रमेश माने यांनी शिक्षकी पेशा सांभाळून सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे," असे गौरवद्गार शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी काढले.

जिल्हा परिषद प्रशाला, कोंड (ता. जि. धाराशिव) येथील शिक्षक रमेश शकुंतला दौलतराव माने यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. सतीश सातपुते यांनी संपादित केलेल्या माने यांच्या जीवनावरील ‘विवेकयात्री’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही आमदार काळे यांच्या हस्ते थाटात पार पडले.
दिग्गजांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) येथील माजी सहसंचालक डॉ. शोभा खंदारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दयानंद जटनुरे (प्राचार्य, DIET धाराशिव),बळीराम चौरे (प्राचार्य, DIET गडचिरोली),अधिव्याख्याता दिलीप जमादार, उमेश नरवडे, सरपंच सुनील शेट्टे, उपसरपंच युवराज जाधव, प्रा. अंकुश नाडे आणि नितिन मेमाणे यांची उपस्थिती होती.
कृतज्ञतेचा ओलावा
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सतीश सातपुते यांच्या संपादकीय प्रास्ताविकाने झाली. शाळेच्या वतीने माने सरांचा आहेर देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गौरवमूर्ती रमेश माने यांनी आपल्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी रोहिणी माळी, रामकिशन सुरवसे आणि छत्रपती इंगोले यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. शोभा खंदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात माने यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी आयोजन
या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन तुकाराम पलमटे व रामकिशन सुरवसे यांनी केले, तर मारुती कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांतीलाल जावळे, नागेश लोहारे, गिरीश माने, डॉ. रितेश माने, निशिकांत मिरकले आणि अंगद भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला माने सरांचे विद्यार्थी, सहकारी, मित्रमंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments