Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रोटरी क्लब मुरूमतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

मुरूम/प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रोटरी क्लब मुरूम यांच्या वतीने मुरूम शहरातील मराठी विषयाच्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि अध्यापनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यथोचित गौरव करून भाषेप्रती आदर व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमात या शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार 
प्राचार्य उल्हास घुरघुरे (प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरूम)प्रा. सतीश रामपुरे (प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय)कांबळे सर (प्रतिभा निकेतन विद्यालय)प्रा. प्रसाद इंगोले (कला व वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून क्लबचे सचिव कल्लप्पा पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना सुनील राठोड यांनी रोटरी क्लब ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे सांगितले. मराठी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक व्हावे आणि भाषेप्रती त्यांचे प्रेम दाखवावे, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तरादाखल बोलताना प्रा. सतीश रामपुरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनीही मराठी भाषेच्या जतनासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले, “मराठी शिक्षकांचा सत्कार म्हणजेच मराठी भाषेचा सत्कार होय. शिक्षकांच्या कार्यामुळेच भाषेची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकते.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव कल्लप्पा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूषण पातळे, सुनील राठोड, मल्लिकार्जुन बदोले, कलया स्वामी आणि प्रकाश रोडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमामुळे मराठी शिक्षकांचा उत्साह वाढला असून उपस्थित सर्वांनी आयोजनाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments