Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात  २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 

विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते, ज्येष्ठ शिक्षिका पिरजादे मॅडम, प्रभाकर जाधव सर, सिताफळे सर, राऊत सर, साठे सर, कुंभार सर तसेच माजी पर्यवेक्षक सावळे सर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

मराठी भाषेचा गौरव व्हावा, तिची समृद्धी वाढावी आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेतील शैली, वाक्प्रचार, म्हणी आणि अलंकारिक भाषेमुळे ही भाषा प्रत्येकाच्या मनामनात रुजलेली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभला असून ही भाषा नव्या पिढीच्या मनात अधिक दृढपणे रुजावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रास्ताविक भाषणात राऊत सर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. जाधव पी.पी. सर यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी गिरे मॅडम, पोहेकर मॅडम, लांडगे मॅडम, रणसुरे सर, बटवालवाड सर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जाधव जी.एल. सर यांनी केले.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments