Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी नगरीत भक्तिचा मळा फुलणार; काटी येथे श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा 'कळसारोहण सोहळा' थाटात रंगणार; १९ आणि २० मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; स्वप्निलजी चामणीकर यांच्या हस्ते होणार मंदिराचे कळसारोहण; पाहा संपूर्ण वेळापत्रक.

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा भव्य कळसारोहण सोहळा येत्या १९ आणि २० मार्च २०२६ रोजी अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. या मंगल सोहळ्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे:
गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ (सांस्कृतिक संध्या):
सोहळ्याची सुरुवात १९ मार्च रोजी सायंकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. यामध्ये चिरंजीव सार्थक बावीकर आणि टीम यांचा 'भक्तीरंग' हा सुरेल गायनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.

शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ (मुख्य सोहळा):
शुक्रवारी मुख्य धार्मिक विधींना सुरुवात होईल:
सकाळी ६:०० वा: श्री भैरवनाथ जोगेश्वरी यांना रुद्राभिषेक आणि वेदमंत्रोच्चारात कळसारोहण पूजेची सुरुवात. सकाळी ९ ते ११ वा: भव्य 'कळस व दिंडी मिरवणूक'.सकाळी ११ ते १२ वा: ह.भ.प. सुनिल महाराज ढगे यांचे कीर्तन. दुपारी १२:३० वा: श्रींची महाआरती.
 दुपारी १ ते ३ वा: महाप्रसाद (भंडारा).
स्वप्निलजी चामणीकर यांच्या हस्ते होणार कळसारोहण
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री स्वप्निल सुधाकरराव चामणीकर (प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांत) यांच्या शुभहस्ते कळसारोहण संपन्न होणार आहे. दुपारी १२ वाजता त्यांचे विशेष प्रबोधनपर संबोधनही आयोजित करण्यात आले आहे.

"समस्त काटी ग्रामस्थ व मंदिर समिती, " यांच्या वतीने या पवित्र सोहळ्यासाठी सर्व भाविकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments