Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'विठूनामाचा गजर आणि तुकोबांच्या पालखीने दुमदुमली काटी नगरी; काटी येथील गुंड परिवाराची परंपरा कायम; विविध धार्मिक कार्यक्रमांनी तुकाराम बीज धार्मिक वातावरणात साजरी'


काटी/उमाजी गायकवाड
  तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार, दिनांक ५ मार्च रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील गुंड परिवाराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट व सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषात गाटे गल्ली भजनी मंडळ व माळी गल्ली भजनी मंडळ यांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. गावातील प्रमुख मार्गावरून तुकाराम महाराजांच्या पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.

दुपारी १२ वाजता अभंगांच्या गजरात व टाळ मृदंगाच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली आणि त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हभप सुनील महाराज ढगे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने या बीज सोहळ्याची सांगता झाली.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनिल गुंड, सुनील गुंड, संतोष गुंड, जितेंद्र गुंड, बाळासाहेब गुंड, दत्तात्रय गुंड, काकासाहेब गुंड, आप्पासाहेब गुंड, रवींद्र गुंड, भागवत गुंड, सचिन सावंत, उमेश सावंत, जीवन गुंड, मदन गुंड, राऊसाहेब गुंड, स्वप्नील गुंड, भालू तात्या मासाळ, काका रोडे, बाबासाहेब रोडे, अनंतराव चिवरे, गणपत चिवरे, तानाजी चिवरे, सूर्याजी चिवरे, सूरज गाटे, तात्या भापकर, मनोहर पिंपळकर, कल्याण गाटे, संताजी भापकर, अनिल गाटे यांच्यासह भजनी मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.                                -अनिल (बापू) गुंड 
पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारसा आम्ही तितक्याच श्रद्धेने पुढे नेत आहोत
          --अनिल गुंड
"तुकाराम बीज हा आमच्या गुंड परिवारासाठी केवळ सण नसून ती एक भक्तीची परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारसा आम्ही तितक्याच श्रद्धेने पुढे नेत आहोत. गावातील सर्व भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य होत आहे, याचे समाधान वाटते."
— अनिल गुंड (ग्रामपंचायत सदस्य, काटी)

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments