काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्तीचा गौरवपूर्ण सन्मान करुन जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील शिक्षिका व इतर महिलांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली.
यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थी संकेत जाऊन याने आईवर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाळेतील सरस्वती जाधव, लता जाधव, सुनिता राठोड, लक्ष्मी पवार, विमल निंबाळकर, शशिकला भोजने, जयश्री, प्रणिता शेटकार, निर्मला हुग्गे, संगीता पाचंगे आणि सुमन सोमानी यांचा कार्यकर्ते गोविंद सोमानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल घुगे यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून संतोष बनसोडे सर उपस्थित होते. त्यांनी महिला दिन का साजरा केला जातो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अनिल घुगे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास गोविंद सोमानी, विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर तसेच विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments