Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ढोकीच्या लेकीची भरारी! रोजंदारी कामगाराच्या कन्येची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड; वडिलांच्या कष्टाला सलाम! ढोकीच्या पद्मजा लंगडे यांची सुरक्षा दलात वर्णी; महिला बचत गटाकडून जंगी सत्कार

ढोकी/सुरेश कदम 
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत आणि जिद्दीच्या जोरावर ढोकी येथील पद्मजा मनोहर लंगडे हिने महाराष्ट्र सुरक्षा दलात 'सुरक्षारक्षक' म्हणून स्थान मिळवले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या बापाचे स्वप्न पूर्ण करत पद्मजाने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संघर्षातून गाठले ध्येय
पद्मजाचे वडील मनोहर लंगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ येथे रोजंदारीवर कार्यरत आहेत. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही त्यांनी स्वतःचे कष्ट उपसून मुलीच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. पद्मजानेही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत रात्रंदिवस अभ्यास केला. पोलीस भरतीची तयारी करतानाच तिने जिद्दीने म.रा.सु.म. च्या परीक्षेत यश मिळवले. हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल (गट क्र. १२) येथे ४५ दिवसांचे कठीण प्रशिक्षण पूर्ण करून तिने महाराष्ट्र सुरक्षा दलात आपली जागा निश्चित केली आहे.

बचत गटाकडून सत्कार सोहळा
पद्मजाच्या या यशाबद्दल ढोकी येथील 'जय शिवराय महिला बचत गटा'च्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे आई-वडील आणि परिवाराचाही सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून मान्यवरांनी तिचे कौतुक केले.

याप्रसंगी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष सुरेश कदम, आशा सुपरवायझर संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम, बचत गटाच्या सदस्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला दिनाचे औचित्य साधून गौरव
याच कार्यक्रमात महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या गिरजाई चाइल्ड सेंटरच्या शिक्षिका, उज्वला मस्के (स्त्री-पुरुष समानता प्रकल्प), वंदना लोहार आणि अंगणवाडी कार्यकर्ती शितल गाढवे यांचाही रेखाताई गुंजकर-कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखाताई कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पद्मजा लंगडे हिने मानले. या यशाबद्दल पद्मजावर ढोकी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments