तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
लातूर ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटोंदा गावाजवळील पुलावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या भीषण घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा थरार
अपघाताचे स्वरूप: हा अपघात तीन वाहनांमध्ये होन्डा सिटी, वॅगनार कार आणि बोलेरो झाला. पुलावर वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
मृत व जखमी: या अपघातात एक व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून एकास तातडीने सोलापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी: अपघातामुळे लातूर-तुळजापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली.
पाटोंदा पूल, लातूर-तुळजापूर रोड वाहने ३ वाहनांचा समावेश यात ३ मृत, २ गंभीर जखमी
कारण प्राथमिक अंदाजानुसार वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा चर्चा केली जात आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३ व्यक्तींपैकी दोघे हे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. मृतांची अधिकृत नावे पोलीस पंचनाम्यानंतर पूर्णपणे स्पष्ट होतील.
जखमी: २ गंभीर जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात (विलासराव देशमुख जीएमसी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
0 Comments