Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

उमरगा-लोहारा तालुका 'पाणंदमुक्त' करणार; शरण पाटील यांचा महसूल विभागाच्या वतीने गौरव

मुरूम/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजने'च्या उमरगा-लोहारा विधानसभा सह-अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरण बसवराज पाटील यांचा महसूल विभागाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते तहसील कार्यालय, उमरगा येथे हा सन्मान सोहळा पार पडला.

राज्य सरकारने शेतकरी केंद्रबिंदू मानून शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या समितीच्या सह-अध्यक्षपदाची जबाबदारी शरण पाटील यांच्यावर सोपवली आहे.

प्रशासकीय बैठक आणि चर्चा:
पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी (दि. १६) शरण पाटील यांनी उमरगा तहसील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागांतील अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. योजनेची व्याप्ती, नवीन शासन निर्णय, प्राधान्याने घ्यावयाचे रस्ते आणि कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

शेतमाल थेट बाजारपेठेत पोहोचणार - शरण पाटील
सत्काराला उत्तर देताना शरण पाटील म्हणाले की, "मजबूत शेतरस्ते हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. चांगल्या रस्त्यांमुळे दूध व्यवसाय, भाजीपाला उत्पादन, कुक्कुटपालन आणि फळबागांच्या वाहतुकीला वेग येईल, पर्यायाने शेतकऱ्यांचा माल थेट बाजारपेठेत वेळेत पोहोचेल. महसूल विभाग आणि शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीच अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आता या शासकीय योजनेच्या माध्यमातून उमरगा आणि लोहारा हे दोन्ही तालुके पूर्णपणे पाणंदमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."

यांची होती उपस्थिती:
या प्रसंगी तहसीलदार गोविंद येरमे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, योगेश राठोड, उपविभागीय अभियंता दिलीप बिराजदार यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments