Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कदमवाडी जिल्हा परिषद शाळेत 'वासंतिक वर्गा'चा उत्साहात शुभारंभ; चिमुकल्यांचे फुगे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत

काटी/उमाजी गायकवाड 
येथील केंद्र नांदुरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठी 'वासंतिक वर्ग' उपक्रमाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व फुगे देऊन जंगी स्वागत करण्यात आले.

पटसंख्या वाढीसाठी विशेष पुढाकार
जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री. घोडके डी. टी. यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकारात्मकता दर्शवली.

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शासकीय योजनांची माहिती
यावेळी शाळेत येणाऱ्या सर्व नूतन चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमात शाळेतील शिक्षिका श्रीमती भुतेकर एस. आर. यांनी शासनाच्या विविध विद्यार्थीभिमुख योजना, शालेय सुविधा आणि शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना दिली.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप श्रीमती भुतेकर एस. आर. यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.


Post a Comment

0 Comments