"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा
मुरुम/प्रतिनिधी
येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्यातील उत्पादन विभागात कार्यरत असलेले कर्मचारी कै. महादेव शिवप्पा लामजने यांचा काही दिवसांपूर्वी कामावर असताना अपघाती मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे लामजने कुटुंबावर कोसळलेल्या संकटाच्या काळात कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.
कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते कै. महादेव लामजने यांच्या पत्नी श्रीमती रेखाबाई महादेव लामजने यांना १० लाख रुपयांचा मदत निधीचा धनादेश नुकताच सुपुर्द करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर:
याप्रसंगी कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, चीफ अकाउंटंट श्री. देशमुख, शरणप्पा कबाडे, संजय आमाशेट्टे, केन अकाउंटंट राजेंद्र पाटील, सहाय्यक इंजिनिअर हेंडले यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कुटुंबाला दिलासा:
कामगाराच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची ओढाताण होऊ नये, या भावनेतून कारखान्याने तातडीने ही मदत उपलब्ध करून दिली आहे. बसवराज पाटील यांनी लामजने कुटुंबाचे सांत्वन करत कारखाना प्रशासन सदैव कामगारांच्या पाठीशी असल्याचे यावेळी आश्वस्त केले.
0 Comments