तुळजापूर | "Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त तुळजापूर येथे राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.
एका महिन्यात दोनदा उपक्रम
राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबने सामाजिक बांधिलकी जपत गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले आहे. यापूर्वी शिवजयंती निमित्त आयोजित शिबिरात ९३ जणांनी रक्तदान केले होते. तर आज बलिदान मासाच्या सांगता दिनी रक्ताची वैद्यकीय निकड लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल १२५ दात्यांनी सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराप्रसंगी तहसीलदार अरविंद बोळंगे, नगरपरिषद मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, रेड्डी साहेब, डॉ. कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी क्लबच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
यांचे लाभले सहकार्य
शिबिर यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष विपीन शिंदे यांच्यासह नितीन सूर्यवंशी, प्रेम कदम, श्रीकांत कावरे, ऋषिकेश साळुंके, सारंग मोरे, धनंजय सावंत, नितीन भांजी, सुमित शिंदे, सर्वेश चव्हाण, अमर गायकवाड, राम ढाकपाडे, गणेश बागल, क्रांती वाकळे, सिद्धी कदम, प्रणव कदम, सुदर्शन वाघमारे, घोडके, अमोल सुरवसे, किरण कदम आणि पद्माकर राव यांनी परिश्रम घेतले. कृष्णा रक्तपेढीच्या टीमने संकलनाचे काम पाहिले.
0 Comments